Wednesday, April 09, 2008

जे जे उत्तम..

केतन ने "जे जे उत्तम.." साठी खो दिलेला तेव्हा हा आठवला..प्रभाकर पेंढारकरांच्या रारंगढांग मधला मला आवडलेला उतारा..मागे वही्त लिहून घेतलेला.आता ब्लॉग मधे लिहायला मजा वाटली..

----

पावसाच्या थेंबाचा हा आवाज सोडला तर रात्रीच्या वेळी सारंच शांत आहे.हिमशिखरावर रेंगाळणारे ढग आता खाली उतरले आहेत.त्यात दूरवरचा किन्नोर कैलास,बलदंड देहाचा रारंग ढांग आणि त्याला विळखा घालून वाहणारी सतलज,सगळंच दिसेनासं झांल आहे.टेबलावरचा कंदील,समोरचे कागद आणि हातातलं पेन एवढ्याच गोष्टींच अस्तित्व उरल्यासारखं वाटत आहे.

हा खराखुरा एकांतवास.पण एकांतवासातही माणूस एकटा थोडाच असतो?माझ्या नाही का तुमच्याशी गप्पा चाललेल्या?

तुम्ही विचारलतं,हिमालय कसा दिसतो?केवढा अवघड प्रश्न!हिमालयाचं मला झालेलं पहिलं दर्शन केवळ अविस्मरणीय.सिमल्याहून पुढं,नारकंड्याला हिमालयाची शुभ्रधवल हिमशिखरं एकदम दिसू लागली.एकाच्या पाठोपाठ दुसरं ,तिसरं..नजर पाहू शकेल एवढी शिखरं!

पण तुम्हाला असा दुरून पोस्टकार्डावरच्या रंगीत चित्रासारखा हिमालय नको आहे.मला हे पटतं!तुम्हाला तुमच्या खोलीतून सागर दिसतो तसा मला इथं हिमालय दिसतो.उगात्या सूर्याचे किरण किन्नोर कैलासच्या शुभ्र शिखरावर पडले की तो सुवर्णाचा होऊन जातो.कधी कधी, संध्याकाळी खालच्या दरीतून ढग वर येतात आणि त्यांतून फक्त शिखरच दिसत राहतं. निळ्या आकाशातून पंख पसरुन निघालेल्या पांढ-याशुभ्र पक्षासारखं!

हिमालयाबद्द्ल लिहीतो आहे खरा.पण प्रतिक्षणी लक्षात येत आहे की त्या किन्नोर कैलासचं,रारंग ढांगाचं आणि सतलज नदीचं वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे. त्यांचे फोटो घेऊन पाठवले तरी त्यांची कल्पना येणं शक्य नाही.कारण निसर्गचित्र म्हणजे निसर्गदृश्य नव्हे.तो निसर्गाशी संवाद व्हावयासं हवा.हा संवाद एकदा साधला की निसर्ग आपणहून तुमच्याशी बोलू लागतो.त्याची भाषा केवढी वेगळी.त्याचे शब्द किती विविध!

त्या सतलजच्या प्रवाहाचा सतत चाललेला ध्रोंकार..रारंग ढांगातले दगड त्या ओघात पडल्यावर उसळणा-या पाण्याचा आवाज..पहाटेच्या वेळी पक्षांची किलबिल,रात्री रातकिड्यांची किरकीर..मेघांचा गडगडाट..क्षणात चमकून जाणा-या विजेचा कडकडाट..कधी वा-याची भणभण..कधी नुसतीच पानांची सळसळ..आणि ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज.इथं येण्यापूर्वी कधी न ऐकलेला.हा आवाज शांततेचा!

Thursday, March 20, 2008

लहानपणीचे सिनेमे..

लहानपणी , म्हणजे ना मी १ली किंवा दुसरीला असताना TV वर रात्री जुन्या हिंदी चित्रपटांचा महोत्सव असायचा ,त्या मधे एका आठवड्यात कुठ्ल्यातरी एकाच hero चे चित्रपट दाखवायचे..तर  मी असा एक गुरूदत-week पाहिला होता.. पाहीला होता म्हणजे हट्टाने जागी राहिले होते पण फारस काही जागं राहणं obviously possible नव्हतं..पहिला चित्रपट होता सोमवारी.."आर-पार"..हे नाव मला जाम मजेशीर वाट्लेलं आणि भेंड्यामधे वापरायला पणं चांगल सोप्प होतं..आणि हाच सिनेमा काय तो मी बराच वेळ पाहीला असेल..त्यातलं एक गाणं " येलोमे हारीपिया.." ऐकून 'हे नक्की हिंदी गाणंच आहे ना..somehow मला ते समजायला बरीचं वर्ष गेली , तेव्हा मला वाटतं होतं की हे रंगांचं गाणं आहे..येलो,हारी..पण english,हिंदी mix का हे नव्हत समजलं..मंगळ्वारी होता "चौदवी का चांद.." ह्यात पहील्या काही मिनिटां मधेच ती उर्दु मिश्रीत हिंदी माझ्या डोक्यावरुन जायला लागली..झोपता झोपता मला तसाच कुठ्लातरी महाल दिसत होता..आणि तो last चा scene आहे ना..तो हि-याची अंगठी गिळतो..तो पाहून पुढ्चे बरेच दिवस अशा अंगठ्यांची धास्ती घेतलेली..मधेच एक सिनेमा होता 'कागज के फूल' ..त्याच केवळ title पाहून मला ऑरगंडीची फूलं आठवलेली इतकचं आठवतयं..आणि सर्वात शेवटी होता "साहब बीवी और गुलाम"..माझी प्रामाणिक अपेक्षा होती कि हा नक्कीच पत्त्यातल्या गुलामा बद्द्ल असला पाहीजे..पण कायं तो तर एकदमचं वेगळा निघाला..पण मला ती हवेली,घोडागाडी आणि मीनाकुमारीची unique style लक्षात राहीलेलं..

खूप वर्षांनी जेव्हा आता हे सगळे चित्रपट खरेखरे पाहीले ना..तेव्हा ते आवडलेचं पण मी त्यातून पण मी लहानपणी पाहीलेल्या scenes ना शोधायचा प्रयत्न प्रत्येक वेळा केलायं

Wednesday, March 05, 2008

Heartfelt

Few years back..to be very specific , in year 2001,there used to be a column in Bombay times, the name was heartfelt. That time I was kind of a person who used to think news paper is all about the main news paper and never had any special interest in BT...not aware of any of the cartoon series etc.. But somehow on one day, while reading a news paper in my college library,someone took away Times from me for some urgent[:P]check and gave me BT. It was a Tuesday, and on the third page , there was a column 'Heartfelt'..somehow that name sounded poetic and I started reading it..I continued and continued voraciously till I finished it..yeah voracious was the only word for it. Heartfelt was a column by Cyrus Merchant.It was a column about spirituality,life ,God and beliefs..All these words sound so heavy that any one would feel the reading about them would need tremendous effort to concentrate and understand and of course the most important thing to have is interest. But Heartfelt was the exception to this philosophy..Cyrus used to write each and everything in a very beautiful and soothing manner. It was neither like a speech nor a philosophy ..but it was a simple talk with a reader..the biggest thing that article do is 'Hope building'...
Some very beautiful lines were

"Despite all the setbacks and sorrows, life is still beautiful,HIS gift to us, to me, to you. Really, what a gift. See life beyond the one you have and are leading, see it as His gift to you, it's not that difficult and its not that late and HE's waiting. I can tell you this much with certainity - HE's waiting for you"

"don't burn your bridges my sweetheart or else how will the one who is meant for you cross over to you....."

You can't move the mountain... ur faith moves God and God moves the mountain for u...

Change the way u think, change ur life,just commit urself to something bigger and more beautiful than gettin up, going to work, cumin back home and sleeping. You will hav happiness. Just try and first giv something to him.

and so many like this..
I have few of those articles..but i really wish to get that book of all the heratfelt.
The book name is again 'heartfelt' ..I am searching for this book since I came to know about it...but couldn't find it uptil now...may b its on the way..and i will get it when I should get it , not before or not after ..just on time..

Sunday, January 27, 2008

Wedding and 'The Wedding'

In last two weeks, I have attended 3 of the best friends’ weddings …so it’s a right time to write on it…Aha nothing shocking as such.. just one more book by Nicholas Sparks which is now my one of the most favorite ..Book is ‘The wedding’.. supposedly a sequel of the ‘The Notebook’. But somehow I wont say it’s a sequel as its an independent story..only thing is Noah and Allie (Lead characters of The Note Book) show their presence in between, but it’s an independent story

We can guess about the story in the few first pages itself. It’s a story about the married life of Noah and Allie’s daughter Jane and her husband. Here is the excerpt from the book itself

“After thirty years of marriage, Wilson Lewis, son-in-law of Allie and Noah Calhoun (of The Notebook), is forced to admit that the romance has gone out of his marriage. Desperate to win back his wife, Jane's, heart, he must figure out how to make her fall in love with him... again “

So it’s very simple to guess the story, but then there comes classic style of Mr. Sparks, which makes the entire book perfect.. I liked the way of narration and a flow and its different from other Sparks books where the story between two people starts and the blossoms…Here it’s an old story which needs reincarnation that makes it very beautiful and sweet.

Oh yes, I haven’t told any thing about characters. The characters of the story is different than any other Sparks book. Jane in story is a cheerful girl, extrovert, social and sensitive.

While Wilson is very simple, hard working, successful and a family person. But he finds uneasy to express his emotions ..and here comes Noah…The entire unfolding of the story is pretty endearing

No emotional complications like any other Sparks book but a very possible case ..

I found it’s a perfect book for a long weekend’s lazy afternoon

Thursday, January 24, 2008

नंदा प्रधान

बरेचदा मला पु.लं च्या व्यक्ती आणि वल्ली मधला नंदा प्रधान आठवतो..तशा व्यक्ती आणि वल्ली मधली प्रत्येक व्यक्तीरेखा लक्षात राहण्यासारखी आहे..पण ना चटका लावणा-या गोष्टी जास्त खोलवर रुजतात ना त्यातलाच प्रकार म्हणा हवं तर..दोन प्रकारातल्या व्यक्तीचं जास्त भेटतात ना..भूतकाळात अखंडपणे रममाण झालेल्या किंवा कशाचाच काही फरक पडतं नाही असं वागणा-रा..पण गोष्टींची समीकरण आपल्याच पद्धतीने सोडवत..कधी थोड्फार त्यात गुंतत..कधी त्याने हेलकावतं ..कधी भरकटतं जाणारं कुणी भेटलं की मला हमखास आठवतो तो 'नंदा प्रधान'

Wednesday, January 16, 2008

पुन्हा प्रवासायन..

किती विचित्र असत ना आपल..

कधीतरी प्रवासाचा कंटाळा येतो...त्य गर्दी मधे आणि बस च्या non-stop खड्खडातामधे जाउच नये मुळी अस वाटत असतं..मग पर्याय नाही असं म्हणून  प्रवासाला निघते..बस मधे ड्राइव्हर च्या मागच्या सीटवर बसायचं..छान लांबसडक नागमोडी रस्ता पाहता पाहता जो आधीचा त्रागा किंवा वैताग असतो तो नाहीसा होवून जातो..

प्रत्येक नव्या वळणासरशी नवा विचार डोकावू लागतो..एखाद्या दूरवर वसलेल्या झोपडीला पाहुन वाटतं काय कारण असावं इतक्या दूर रानात राहायचं..कधी काही लागलं तर काय करत असतील इथली माणसं..कोणाची तरी वाटं पाहणारी नजर आपली हूरहूर कोणाला बोलून दाखवत असेल..

कधी एखादं छोटसं गावं लागतं ..कसं उभं राहीलं असावं हे गावं..हां ते छोटसं तळ आहे ना ..तीथेचं कुणी पथारी पसरून पहुडलं असेलं का ..किंवा ती आमराई  पाहुन कुणाला तीच्या तीच्या सावलीमधून बाहेर पडायची इच्छा झाली नसेल ..ख्ररं कशी वसतं असावी ही गावं..

कधी एखादी टुमदार शाळा दिसते ..कशी असेल ती शाळा असेल ती शाळा आतून..कसे असतील वर्ग..प्रत्येक शाळेतले सारखेच असतात ना ..अंकलेखनाचे ,अक्षरांचे तक्ते,दिशा ओळख, परिसर ,किती सा-रा सारख्या गोष्टी ..ह्या वर्गामधे तसेच लाकडी बेंच असतील ..आणि त्यांना मधे कंपासच्या टोकाने सीमा आखली असेल ..मजेशीर असतात ना अशा सीमा..आखूनही न जाणवणा-रा ..नाहीतर आपण न दिसणा-रा सीमा शोधतं स्वताच्या कोषात हरवतो .. 

अन कधी एखादी अवचित भेटणारी नदी ..दूरदूर पासून आपला ठाव मागे सोडत आलेली  ..नाव काय असेल हीचं...कुठून आली असेल ..अजुन कुठे दूर वाहत जाइल ..असे खुपसे प्रश्न सुचवून दूर जाणारी ..तर ..इति प्रवासायन..

Saturday, January 12, 2008

ट्रॉय..

Alright..आधीचं मान्य करते हे post लिहायला तसा थोडा उशीरचं झालायं..थोडा म्हणजे किती असा प्रश्न आलाच तर उत्तर आहे, फ़क्त ३.५ वर्ष ..असो..तर काल मी निवांतपणे ट्रॉय पाहीला..आधी बरेचदा तुकड्या तुकड्यां मधून पाहीलेला..
एक युद्ध होणार आहे..त्याचं उत्तरही माहीत आहे तरीही प्रत्येकाचा स्वत:शीच चाललेला जीवनझगडा..
अमरत्वाची ध्यास असलेला Achilles , स्वत:बद्दल लिहीलेला भविष्य खरं करण्यासाठीच ट्रॉयला येतो..
Myrmidons! My brothers of the sword! I would rather fight beside you than any army of thousands! Let no man forget how menacing we are, we are lions! Do you know what's waiting beyond that beach? Immortality! Take it! It's yours!
पण एका हळव्या क्षणांमधे तोही परत जायच ठ्ररवतो..पण तो स्वत: म्हणतो तसं ..nothing is easier ..त्याला तीथे थांबाव लागणारं असत..आणि दुसरा Hector ..भावाच्या वेडेपणाला मोठेपणाने स्विकारत नको असलेल्या युद्धाला आणि ज्याच्याशी त्याची शेवटची लढाई ठरलेली आहे ..त्या Achilles ल धीरोदात्तपणे सामोरं जातानाही एकच इच्छा असते "All my life I've lived by a code and the code is simple: honor the gods, love your woman and defend your country. Troy is mother to us all. Fight for her! "
आणि हे युद्ध अशाच प्रकारे घडवण्यासाठी काराणीभूत असलेलं Nestor चं एकचं वाक्य..This will be the greatest war the world has ever seen..
आणि एका छोट्या संदेशवाहकाचा मोठा प्र्श्न" The Thesselonian you're fighting... he's the biggest man i've ever seen. I wouldn't want to fight him". ह्यावर Achilles चं उत्तर "Thats why no-one will remember your name. "

म्हणूनचं बहुधा Iliad महाकाव्य आहे..